Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कुर्ला टू वेंगुर्ला”मधून उलगडणार ‘एका लग्नाची गोष्ट’, वीणा जामकर – वैभव मांगले प्रमुख भूमिकेत

सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत. अनेक हिंदी वा इंग्रजी चित्रपटांसह तिकीट बारीवर चांगला गल्ला जमवत आहेत आणि आता असाच एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांचे मन जिंकायला येत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 17, 2025 | 10:26 AM
कुर्ला ते वेंगुर्ला होणार सप्टेंबरमध्ये प्रदर्शित

कुर्ला ते वेंगुर्ला होणार सप्टेंबरमध्ये प्रदर्शित

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षणात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाही बदलल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटातून उलगडणार आहे. 

अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून अभिनेते सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर, साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सध्या मराठी चित्रपटांचा गल्लाही चांगलाच जमलेला दिसून येत आहे. वेगवेगळ्या विषयावरील चित्रपट हे मराठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणत असल्याचेही दिसत आहे. असाच हा चित्रपट काय कमाल करणार हे आता सप्टेंबरमध्येच कळेल. 

Salman Khan ने विकले मुंबई उपनगरातील अपार्टमेंट, तब्बल 5.35 कोटीला; दुबईपर्यंत पसरली आहे अरबोंची नेटवर्थ

कशी असणार कथा 

काही वर्षांत गावातल्या मुलांची लग्न जमणे ही एक समस्याच झाली आहे. याच संकल्पनेचा वेध “कुर्ला टू वेंगुर्ला” हा चित्रपट अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला गेला आहे. आजच्या काळातील मुला-मुलींच्या आकांक्षा, त्यांच्या पालकांची इच्छा-अपेक्षा, गाव आणि शहरातील स्थिती असे मुद्दे मनोरंजक पद्धतीने हाताळत एक धमाल गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे घरोघरी असणारी कहाणीच आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. धमाल गोष्टीला मालवणी भाषेचा तडकाही आहे. प्रत्येकाचं मनोरंजन करणारी आणि प्रत्येक घराला रिलेट होणारी ही गोष्ट आहे. म्हणूनच नावापासून कुतुहल निर्माण करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता १९ सप्टेंबरपर्यंत वाट पहावीच लागेल यात शंका नाही.

गावाकडील कथा या मराठी माणसाची खरंतर नाळ आहे. गावाशी जोडणाऱ्या कथांशी मराठी माणूस पटकन जोडला जातो. त्यामुळे या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या आता अनेक अपेक्षा असतील यात काही दुमत नाही. तर चित्रपटात तेच तेच मराठमोळे चेहरे पाहण्यापेक्षा काही वेगळे चेहरे जे मालिकेत काम करतात ते यातून दिसणार आहेत आणि त्यामुळे थोडा वेगळेपणाही प्रेक्षकांना जाणवेल.

कुर्ला ते वेंगुर्लामागील मेहनत 

सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थानी  “कुर्ला टू वेंगुर्ला” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे, एम. व्ही. शरतचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन अमरजित आमले यांनी, तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केलं आहे. 

रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी छायांकन, विजय कलमकर यांनी संकलन, अविनाश सोनावणे यांनी ध्वनिआरेखन, चंचल काळे, अमरजित आमले यांनी गीतलेखन,  अक्षय खोत यांनी संगीत दिग्दर्शन, पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे तर वितरक म्हणून पिकल इंटरटेनमेंट काम पाहणार आहे. 

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला ब्रेकअप सहनच नाही झाले, 38 व्या वर्षीही आहे सिंगल, म्हणते ‘मी कमनशिबी आहे…’

Web Title: Marathi movie kurla to vengurla will be release on 19 september vaibhav mangle veena jamkar seen as lead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • Entertainment marathi
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज
1

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज

Raksha Bandhan 2025: भावाची कमतरता पूर्ण करतात या बॉलीवूड सिस्टर्स, बांधतात राखी करतात रक्षण
2

Raksha Bandhan 2025: भावाची कमतरता पूर्ण करतात या बॉलीवूड सिस्टर्स, बांधतात राखी करतात रक्षण

“… त्यामुळे मनात भिती होती” अभिनेता क्षितीश दातेचा ‘मिस्ट्री’ वेबसीरीजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?
3

“… त्यामुळे मनात भिती होती” अभिनेता क्षितीश दातेचा ‘मिस्ट्री’ वेबसीरीजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?

प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची अद्भुत कहाणी, ‘असंभव’चा फर्स्ट लूक रिलीज
4

प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची अद्भुत कहाणी, ‘असंभव’चा फर्स्ट लूक रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.