Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OpenAI ने रिलीज केला नवीन एआय मॉडेल, युजर्सना मिळणार फ्री सर्विस! DeepSeek ला देणार टक्कर

चायनीज स्टार्टअप DeepSeek ने AI क्षेत्रात खळबळ उडवली आहे. DeepSeek AI मॉडेलने OpenAI च्या ChatGPT चा पराभव केला आहे. ChatGPT सह AI मॉडेलच्या शर्यतीत अमेरिका आघाडीवर होती. मात्र आता DeepSeek ने अव्वल स्थान गाठलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 01, 2025 | 11:38 AM
OpenAI ने रिलीज केला नवीन एआय मॉडेल, युजर्सना मिळणार फ्री सर्विस! DeepSeek ला देणार टक्कर

OpenAI ने रिलीज केला नवीन एआय मॉडेल, युजर्सना मिळणार फ्री सर्विस! DeepSeek ला देणार टक्कर

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून AI क्षेत्रात चर्चेत असणारी दोन नावं म्हणजे OpenAI आणि DeepSeek. DeepSeek ने अमेरिकेत OpenAI च्या AI मॉडेल चॅटजीपीटीला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं. DeepSeek ने जगातील पहिल्या AI मॉडेलला मागे टाकल्याने त्याची प्रचंड चर्चा सुरु झाली. DeepSeek युजर्समध्ये लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे त्याची फ्री सर्विस. DeepSeek आणि OpenAI मध्ये अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. अनेक असे देश देखील आहेत ज्यांनी DeepSeek वर बंदी घातली आहे. हे संपूर्ण प्रकरण सुरु असतानाच OpenAI ने आता एक नवीन AI मॉडेल लाँच केले आहे. ‘O3 Mini’ या नावाने OpenAI ने नवीन AI मॉडेल जारी केले आहे.

आता केवळ 10 मिनिटांत घरी येणार Vivo चे स्मार्टफोन्स, या कंपनीसोबत केली हातमिळवणी

DeepSeek सोबत सुरु असलेल्या वादादरम्यान या AI मॉडेलला टक्कर देता यावी यासाठी आता कंपनीने ‘O3 Mini’ लाँच केले आहे. नवीन AI मॉडेल ‘O3 Mini’ ची खास गोष्ट म्हणजे ते मानवाप्रमाणे तर्क करण्यास सक्षम असेल. O3 Mini हे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच झालेल्या शक्तिशाली O3 चे उत्तराधिकारी मॉडेल असल्याचे सांगितले जाते. कंपनीचे दोन्ही मॉडेल कोडिंग, गणित आणि विज्ञानाशी संबंधित कठीण प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. नवीन मॉडेल ChatGPT AI चॅटबॉटद्वारे अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते. ‘O3 Mini’ चा वापर करण्यासाठी वापरकर्त्यांना कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत, ते पूर्णपणे विनामूल्य आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

प्रो आणि टीम सेवांसाठी पैसे देणाऱ्या वापरकर्त्यांना ChatGpt Plus सह O3 Mini मोफत वापरता येईल. हे मॉडेल ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणजेच API द्वारे देखील अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते. असे सांगण्यात येत आहे की कंपनी 1 आठवड्याच्या आत एंटरप्राइजेससाठी देखील उपलब्ध करेल.

चीनचा AI चॅटबॉट DeepSeek आल्यानंतर त्याचा परिणाम उद्योगावर दिसून आला. ज्याला प्रतिसाद म्हणून OpenAI ने आपला नवीन चॅटबॉट लाँच केला आहे. ओपन-सोर्स AI मॉडेल DeepSeek यूएसमध्ये विकसित केलेल्या AI मॉडेलपेक्षा स्वस्त मानले जाते. याचा अर्थ ते किफायतशीर मानले जाते. शिवाय युजर्सच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी देखील सक्षम आहे.

Budget 2025: ग्राहकांच्या खिशावरचा ताण कमी होण्याची शक्यता, स्मार्टफोन्स आणि हे प्रोडक्ट्स स्वस्त होण्याची अपेक्षा

इंटेलचे माजी सीईओ पॅट गेल्सिंगर यांनीही DeepSeek AI मॉडेलचे कौतुक केले आहे. गेल्सिंगर म्हणतात की DeepSeekची किंमत कमी आहे. तसेच, ते वापरकर्त्यांच्या समस्या किंवा शंकांचे निराकरण करण्यास सक्षम असेल. पॅट गेल्सिंगर म्हणाले की DeepSeek आपल्याला संगणकीय इतिहासातील तीन महत्त्वाच्या धड्यांची आठवण करून देतो. DeepSeek ची किंमत कमी आहे आणि त्याचा बाजारावर प्रभाव जास्त असेल. यामुळे AI तंत्रज्ञानाचा आणखी विस्तार होईल.

OpenAI चे DeepSeek AI मॉडेलवर गंभीर आरोप

OpenAI ने चीनी स्टार्टअप DeepSeek वर गंभीर आरोप केले आहेत. OpenAI ने म्हटलं आहे की, DeepSeek ने OpenAI मॉडेलच्या मदतीने AI मॉडेलचे प्रशिक्षण दिले आहे. याच्या समर्थनार्थ अमेरिकन कंपनीने पुरावेही सादर केले आहेत. मायक्रोसॉफ्टने याबाबत माहिती दिली असल्याचे ओपनएआयने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टच्या सुरक्षा टीमने गेल्या वर्षी काही संशयास्पद हालचाली लक्षात घेतल्या, जिथे DeepSeek शी संबंधित लोकांनी OpenAI च्या API द्वारे मोठ्या प्रमाणात डेटा काढला होता.

Web Title: Tech news openai released new ai model which compete with deepseek users will get free service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज
1

आजचे Google Doodle का आहे खास? क्रिकेटच्या चाहत्यांसाठी ठरतंय सरप्राईज

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे
2

Jio Recharge Plan: 90 दिवसांचा जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2GB हाई-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार बरेच फायदे

iPhone 17 Price Dropped: लाँचनंतर काही दिवसांतच घसरली नव्या आयफोनची किंमत, आता केवळ इतक्या रुपयांत करा खरेदी! इथे मिळतेय ढासू डील
3

iPhone 17 Price Dropped: लाँचनंतर काही दिवसांतच घसरली नव्या आयफोनची किंमत, आता केवळ इतक्या रुपयांत करा खरेदी! इथे मिळतेय ढासू डील

ॲड-फ्री YouTube आता स्वस्त दरात! ‘YouTube Premium Lite’ भारतात लाँच, किंमत फक्त…
4

ॲड-फ्री YouTube आता स्वस्त दरात! ‘YouTube Premium Lite’ भारतात लाँच, किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.