• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Anniversary Of Afghanistan Under Taliban Rule Nrvb

विशेष : तालिबान राजवटीतील अफगाणिस्तानची वर्षपूर्ती

गेल्या वर्षीचा ऑगस्ट महिना उजाडला, तो तालिबान्यांच्या अफगाणिस्तानमधील प्रवेशानं. त्यापूर्वीच अमेरिकेनं तिथलं सैन्य काढून घेतलं होतं. ‘नाटो’चं कुणीही तिथं नव्हतं. स्थानिक सरकारच्या कारभाराला वैतागलेल्या आणि साधा पगारही न करू शकलेल्या सरकारविरोधात तिथल्या सैन्यात नाराजी होती. त्यामुळं तालिबानला अफगाणिस्तानचा ताबा अगदी सहज मिळाला. गेल्या वर्षभरात अल-कैदाचा प्रमुख अल जवाहिरीचा खात्मा करण्यात अमेरिकेला यश आलं; परंतु सत्तापालट होऊनही अफगाणिस्तानच्या जनतेच्या हालअपेष्टा कमी झाल्या नाहीत.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 21, 2022 | 06:00 AM
विशेष : तालिबान राजवटीतील अफगाणिस्तानची वर्षपूर्ती
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्या वर्षभरापूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानी दहशतवाद्यांनी कब्जा केला. त्याअगोदर तालिबानी दहशतवाद्यांनी एकामागून एक भाग ताब्यात घेतला होता. त्या वेळी अफगाणिस्तान सोडून अन्य देशांत जाणाऱ्यांचे काय हाल झाले, हे जगानं पाहिलं. अफगाणिस्तान सोडून जगातील अनेक देशांत आश्रय घेणाऱ्यांची संख्या लाखोंत होती.

तालिबाननं काबूलचा ताबा घेतला होता. त्यावेळी तालिबानच्या वतीनं संघटनेचा प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद यानं नव्या सरकारच्या वतीनं अनेक आश्वासनं दिली होती. तालिबान राजवटीनं ती आश्वासनं पाळली का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. एक वर्षाचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्षात काय झालं, हे जगानं पाहिलं आहे. यापूर्वीच्या तालिबान राजवटीनं १९९० च्या दशकात महिलांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले होते.

गेल्या वर्षी तालिबान सत्तेत परतल्यावर अफगाणिस्तानमध्ये महिलांवर अनेक निर्बंध पुन्हा लादण्यात आले. महिलांच्या पोशाखाचे नियम आणि कायदे बनवले गेले आणि सार्वजनिक ठिकाणी पुरुष ‘पालक’ सोबत न घेता महिलांच्या वावरावर बंदी घालण्यात आली. मार्चमध्ये जेव्हा नवीन शैक्षणिक सत्रासाठी शाळा पुन्हा सुरू झाल्या, तेव्हा तालिबाननं त्यांच्या पूर्वीच्या वचनाला हरताळ फासला. मुलींना हायस्कूलमध्ये जाण्यास बंदी घातली. यासाठी तालिबाननं महिला शिक्षकांची कमतरता आणि शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची सोय नसल्याचा दाखला दिला.

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार तालिबानच्या या निर्णयाचा ११ लाख मुलांवर परिणाम झाला आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत आहे. अफगाणिस्तानातील प्राथमिक शाळांमध्ये मुलींना शिकण्याची परवानगी देण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात काही सरकारी विद्यापीठं मुला-मुलींसाठी पुन्हा उघडण्यात आली.

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या उन्हाळ्यात तालिबान सत्तेवर आल्यानंतर काम करणाऱ्या महिलांच्या संख्येत घट झाली आहे, तर १९९८ ते २०१९ दरम्यान, एकूण कर्मचाऱ्यांमध्ये कार्यरत महिलांची संख्या १५ टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तथापि, सत्तेत परतल्यानंतर, तालिबाननं महिलांच्या घराबाहेरील वावरावर बंदी घालण्यास सुरुवात केल्यामुळं २०२१ मध्ये देशातील कामकाजी महिलांची संख्या १५ टक्क्यांनी कमी झाली.

‘ॲम्नेस्टी’ या मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं जुलैमध्ये आपल्या अहवालात म्हटलं आहे की, तालिबाननं अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांचे हक्क संपवले आहेत. या अहवालात तालिबानच्या निर्बंधांविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकाराचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबाननं देशाचा ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था ३० ते ४० टक्क्यांनी संकुचित झाल्याचं सुरक्षा परिषदेनं जूनमधील आपल्या अहवालात म्हटलं आहे.

अफगाणिस्तानमधील अमेरिका अनुदानित पुनर्बांधणी प्रकल्पांवर देखरेख करणाऱ्या एका सरकारी संस्थेनं आपल्या मूल्यांकनात निष्कर्ष काढला की, देशाला काही आंतरराष्ट्रीय मदत मिळत असताना, आर्थिक परिस्थिती भयानक आहे. बँक खाती गोठवल्यामुळं देशाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. याची भरपाई करण्यासाठी तालिबाननं कर महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर जगभरात ज्या प्रकारे कोळशाच्या किमती वाढल्या आहेत, त्याचा फायदा घेण्यासाठी तालिबाननंही निर्यात वाढवली आहे.

जानेवारीमध्ये, तालिबाननं तीन महिन्यांच्या बजेटची घोषणा केली, ज्यामध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान देशांतर्गत स्त्रोतांकडून सुमारे ४०० दशलक्ष डॉलर गोळा होण्याची अपेक्षा होती. आंतरराष्ट्रीय पाठिंब्याचा अभाव, सुरक्षा आव्हानं, पर्यावरणीय समस्या आणि जगभरातील अन्नधान्याच्या वाढत्या किमती ही अफगाणिस्तानची आर्थिक परिस्थिती झपाट्यानं ढासळण्याची प्रमुख कारणं आहेत. अफगाणिस्तानातील अफूच्या लागवडीला सामोरं जाण्याचं तालिबानचं वचन त्यांच्या मागील राजवटीचं धोरण दर्शवतं.

दोन दशकांपूर्वी शेवटच्या वेळी तालिबान सत्तेवर असताना त्यांना यात काही प्रमाणात यश आलं होतं. अफूचा वापर हेरॉईन तयार करण्यासाठी केला जातो आणि अफगाणिस्तान हा वर्षानुवर्षे जगातील सर्वात मोठा अफूचा पुरवठादार आहे. या वर्षी एप्रिलमध्ये तालिबाननं अफूच्या लागवडीवर बंदी घातली होती. हेलमंड प्रांतातून असे अहवाल आले आहेत, जे सूचित करतात की, काही अफू पिकवणाऱ्या भागात तालिबान शेतकऱ्यांवर त्यांची खसखस नष्ट करण्यासाठी दबाव आणत आहेत.

जुलैमध्ये अमेरिकन सरकारच्या अहवालात असं म्हटलं आहे की, तालिबानने अफूच्या लागवडीत गुंतलेल्या शेतकऱ्यांचा पाठिंबा गमावण्याचा धोका पत्करला आहे आणि ते त्यांच्या निर्बंधांबाबत कठोर असल्याचं दिसून आलं आहे. तथापि, अफगाणिस्तानच्या मादक पदार्थांच्या अर्थव्यवस्थेचे तज्ज्ञ डॉ. डेव्हिड मॅन्सफिल्ड सांगतात की, तालिबाननं अफूच्या लागवडीवर बंदी घालण्याची घोषणा केली, तोपर्यंत मुख्य पीक कापणी झाली होती.

डॉ डेव्हिड मॅन्सफिल्ड म्हणतात, “अफगाणिस्तानच्या नैऋत्य भागात अफूचं दुसरे (वार्षिक) पीक कमी आहे, त्यामुळं ते नष्ट केल्यानं फारसा फरक पडणार नाही.” अफगाणिस्तानमध्ये क्रिस्टल मेथसारख्या इतर अंमली पदार्थांचं उत्पादन वाढत आहे. तथापि, तालिबाननं ते तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जंगली पिकावर (इफेड्रा) बंदी घातली आहे. तालिबाननं पुन्हा सत्तेवर येण्यासाठी छेडलेलं युद्ध आता जवळपास संपलं आहे; पण गेल्या वर्षी ऑगस्ट ते या वर्षी १५ जून या कालावधीत दोन हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेल्याची नोंद संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार झाली आहे. यामध्ये मृतांची संख्या सातशे असून जखमींची संख्या १४०० आहे.

ऑगस्ट २०२१ पासून अफगाणिस्तानमधील कोणत्या ना कोणत्या हिंसक कारवायांमध्ये मारल्या गेलेल्या सुमारे ५० टक्के लोकांना ‘इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया अँड इराक’ म्हणवणाऱ्या अतिरेकी संघटनेच्या खोरासान शाखेला जबाबदार धरण्यात आलं आहे. ‘इसिस’चा हा गट अजूनही अफगाणिस्तानात सक्रिय आहे. अलीकडच्या काही महिन्यांत ‘इसिस’नं हल्ल्यात नागरिकांना लक्ष्य केलं आहे.

अफगाणिस्तानमधील इतर तालिबान विरोधी शक्ती, ‘नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट’ (एनआरएफ) आणि ‘अफगाणिस्तान फ्रीडम फ्रंट’ (एफएफ) यांची उपस्थितीदेखील वाढली आहे. अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या डझनभर फुटीरतावादी गटांचा संदर्भ देत संयुक्त राष्ट्र संघानं जूनमध्ये सांगितलं की, देशातील सुरक्षा वातावरण अनिश्चिततेकडं जात आहे.” संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानमध्ये मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. त्यात योग्य प्रक्रियेचं पालन न करता लोकांचा जीव घेणं, बेकायदेशीरपणे ताब्यात घेणं आणि तालिबानकडून छळ करणं या प्रकरणांचाही समावेश आहे. ऑगस्ट, २०२१ ते जून, २०२२ दरम्यान, मागील सरकारशी संबंधित किमान १६० लोक आणि सुरक्षा दलांचे अधिकारी मारले गेले आहेत.

एकंदरित ही परिस्थिती पाहता तालिबानची आणि अफगाणिस्तानची आर्थिक कोंडी झाली आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तान सरकारचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. त्यात पाकिस्तानकडून तालिबानला मदत मिळण्याची जी अपेक्षा होती, ती फोल ठरली आहे. पाकिस्तानच दिवा‍ळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामु‍ळं तालिबानला भारताची मदत घेण्याची वेळ आली आहे.

अफगाणिस्तानचं संकट मोठं आहे, ते लवकर दूर होण्याची शक्यता नाही. त्यातच दर काही दिवसांनी तिथं स्फोट होत आहेत. शांततेच्या काळातच देशाची प्रगती होत असते. जवाहिरीच अफगाणिस्तानमध्ये घुसून हल्ला केल्यामुळं अमेरिकेशीही तालिबानचं शत्रुत्व वाढलं आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानला गतवैभव प्राप्त करणं हे सध्यातरी अशक्यप्राय आहे.

भागा वरखडे

warkhade.bhaga@gmail.com

Web Title: Anniversary of afghanistan under taliban rule nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2022 | 06:00 AM

Topics:  

  • Afghanistan
  • Rule

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Jan 07, 2026 | 08:15 AM
Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

Jan 07, 2026 | 08:08 AM
Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता

Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता

Jan 07, 2026 | 07:56 AM
केसांना जपण्यासाठी आधी केसांखालची त्वचा जपा! टिप्स फॉलो करा आणि डोक्यावर चंद्र होण्यापासून स्वतःला वाचवा

केसांना जपण्यासाठी आधी केसांखालची त्वचा जपा! टिप्स फॉलो करा आणि डोक्यावर चंद्र होण्यापासून स्वतःला वाचवा

Jan 07, 2026 | 07:15 AM
राजधानी दिल्लीत वर्षातील पहिला थंड दिवसाची नोंद; दाट धुक्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली

राजधानी दिल्लीत वर्षातील पहिला थंड दिवसाची नोंद; दाट धुक्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावली

Jan 07, 2026 | 07:04 AM
डिजिटल अरेस्टपासून खोट्या डिलीव्हरीपर्यंत… हॅकर्स वापरतात ‘या’ 5 कॉमन ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या आणि राहा सुरक्षित

डिजिटल अरेस्टपासून खोट्या डिलीव्हरीपर्यंत… हॅकर्स वापरतात ‘या’ 5 कॉमन ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या आणि राहा सुरक्षित

Jan 07, 2026 | 06:07 AM
कॅन्सरच्या जीवघेण्या गाठी नष्ट करून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पोट आतड्यांच्या कॅन्सरपासून मिळेल सुटका

कॅन्सरच्या जीवघेण्या गाठी नष्ट करून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पोट आतड्यांच्या कॅन्सरपासून मिळेल सुटका

Jan 07, 2026 | 05:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.